औरंगाबाद: मंगळवारी तिसऱ्या टप्प्यातील औरंगाबाद लोकसभेचे मतदान शांततेत पार पडले.मात्र काही जण मत कुणाला दिले.किंवा इतर पक्षाचा काम केल्याच्या कारणावरून भांडण करण्याच्या मनस्थितीत असतात अशा विघ्नसंतोषीवर तडीपार किंवा एमपीडीए ची कारवाई करण्यात येईल असा इशारा पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी दिला आहे.
मागील दीड वर्षांचा शहराचा इतिहास बघितला तर या शहराने अनेक दंगली पाहिल्या आहेत. त्या अनुषंगाने संवेदनशील आणि अतिसंवेदनशील भागात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त होता. त्यामुळे शहरात कुठेही मतदान केंद्रावर अनुचित प्रकार घडला नाही. मतदान शांततेत पार पडले. निकालासाठी अजून महिनाभराचा कालावधी बाकी आहे. पक्षाचे व उमेदवारांचे कार्यकर्ते गल्ली-बोळात आपलाच उमेदवार येणार याचे गणित मांडत आहेत. तर चौरंगी लढत असल्याने कार्यकर्ते देखील विभागले गेले आहेत. याचाच परिणाम काही भागांत पूर्वी इतर पक्षात काम करणारे आज दुसऱ्या पक्षाचा काम करताना दिसले. यामुळे काही ठिकाणी शाब्दिक बाचाबाची देखील झाली.मात्र, निवडणुकीच्या मुद्द्यावर व मत कुणाला दिले या मुद्द्यावरून अनेक जण मनात राग धरून आहेत. अशा विघ्नसंतोषी लोकांना पोलीस आयुक्तांनी इशारा दिला आहे. जर कोणी मतदाराला मतदान करण्यावरून मारहाण करीत असेल, धाक दडपशाही करून सामाजिक सलोखा बिघडवून वातावरण दूषित करेल अशावर तडीपार किंवा मग थेट एमपीडीए ची कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे निवडणुकीवरून केलेले भांडण तुम्हाला कारागृहात किंवा जिह्याबाहेर पाठवू शकते .